किणीचे विद्यार्थी धावले निराधारांच्या मदतीला, माडखोलकर महाविद्यालयाच्या एन.एस.एस विद्यार्थ्यांचे आवाहनाला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2020

किणीचे विद्यार्थी धावले निराधारांच्या मदतीला, माडखोलकर महाविद्यालयाच्या एन.एस.एस विद्यार्थ्यांचे आवाहनाला प्रतिसाद

तेऊरवाडी (प्रतिनिधी)
      चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनचे समन्वयक प्रा. एस. एन. पाटील व  एन. एस. एस विद्यार्थ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत किणी (ता. चंदगड) गावातील व परिसरातील मित्र परिवार कोरोणाच्या वाढत्या संख्येचा विचार करून याचा फटका बसलेल्या कुटुंबियांच्या मदतीला सरसावले आहेत.
       कोरोना ची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना आपल्या चंदगड तालुक्यात मोलमजुरी करण्यासाठी, लोकांना रस्त्यावरचे खेळ दाखवून पोट भरणारे(राजलक्ष्मी), शेतीच्या अवजारांची कामे करणारे (धावड), आंधळे कुटुंबीय, घराची कामे करणारे (लमानी, गवंडी), पारधी, गोसावीअनाथ, अपंग, बेघर इत्यादी लोकांना अन्नधान्याची व जीवनावश्यक वस्तूंची  तात्काळ  गरज होती. अशा कुटुंबातील लोकांना मदत करण्याचे आवाहन माडखोलकर महाविद्यालयाच्या एन. एस. एसच्या संयसेवकांनी  केले. यानुसार व किणी मधील काही विद्यार्थ्यी
विवेक मनगुतकर, युवराज नौकुडकर, शुभम तरवाळ, गजू मोहनगेकर व संदीप बिर्जे  (किणी) यांनी  लागलीच मित्रांच्या मदतीने सर्वांची हि गोष्ट सांगितली. गावातील तसेच बाहेरील गावच्या मित्रांनी सढळ हाताने मदत जमा केली. याबरोबरच  ५० किलो तांदूळ जमा केले. लागलीच या सर्वानी खालील प्रमाणे सर्व साहित्य खरेदी करून २० कुटुंबाना पुरेल अशा  २० पिशव्या तयार करून वितरित केल्या.
      मित्र असतील तर या जगाच्या पाठीवरचे कोणतेच काम अवघड नाही असे या घटनेवरून दिसून येते. मोबाईलच्या रिचार्ज साठी धडपड करणाऱ्या पोरांनी सुद्धा विचार न करता पैसे दिले. सद्या मुंबई व बेंगलोर मध्ये अतिशय बिकट अवस्थेत असणारे मित्रांनीही  यासाठी मदत केली आणि करतसुद्धा आहेत. यापेक्षा खरी दानत कोणतीच नसेल. आजच्या तरुणाईला नावे ठोवणाऱ्यांनाही लक्षात आले की  ही आजकालची मुलं सुद्धा भावनिक आणि माणुसकीचा विचार करतात. चंदगड  तालूुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक युवकांनी अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे येवून आपापल्या परीने मदत केल्यास कोणीही उपाशी रहाणार नाही हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment