२७ मे पासून महाकरिअर पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2020

२७ मे पासून महाकरिअर पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मजरे कार्वे / प्रतिनिधी
        राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टल सुरु करण्यात आले असून त्याचे उद्‌घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.
     राज्यातील 9 ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 556 कोर्सेस व 21 हजार व्यावसायिक संस्था व महाविद्यालयाची माहिती दिली असून, कोर्सेसचा कालावधी, फी, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध नोकरी इत्यादी माहिती या पोर्टलवर मिळेल.
विद्यार्थ्यांना 27 मे पासून सरल प्रणालीचा आयडी व पासवर्ड वापरुन पोर्टलचा वापर करता येणार आहे. याचा सर्वच विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.


No comments:

Post a Comment