चंदगड तालुक्यासाठी धोक्याची घंटा, आज दिवसभरात कोरोनाचे ७ नवे रुग्ण, रुग्णसंख्या २५ वर, ग्रामीण भाग भितीच्या छायेखाली - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2020

चंदगड तालुक्यासाठी धोक्याची घंटा, आज दिवसभरात कोरोनाचे ७ नवे रुग्ण, रुग्णसंख्या २५ वर, ग्रामीण भाग भितीच्या छायेखाली


चंदगड / प्रतिनिधी
    देशासह राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. पुणे-मुंबईसह अन्य शहरातून गावी आलेल्या नागरीकांच्यामुळे तालुक्यातील विविध गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. चंदगड तालुक्यात कालपर्यंत रुग्णसंख्या १८ होती. त्यामध्ये आज चंदगड तालुक्यातील सत्तेवाडी येथे ५ व नांदुरे येथे २ असे तब्बल ७ रुग्णांची भर पडल्याने आकडा २५ वर पोहोचला आहे. त्यामुळे शहरातून आलेल्या नागरीकांच्यामुळे ग्रामीण भागात धोका वाढला आहे.
सत्तेवाडी येथे सापडलेले पाच व नांदुरे येथे सापडलेले दोन रुग्ण हे 13 व 14 मे ला मुंबईहून आपल्या गावी आले होते. त्यांना गावातील शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवले होते. आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंदगड येथील ॲग्नेल स्कुलमधील करोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात येणार आहे. या दोन्ही गावातील व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरु असून संपर्कातील नागरीकांचा स्वॅब घेवून तो देखील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्यावर चंदगड येथील करोना केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार असल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली. चंदगड शहरापासून एक किलोमीटर अंतरावर करोना केअर सेंटर आहे. चंदगड तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चंदगड शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्याची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे शहरात आज तिसऱ्या दिवशीही बाजारपेठेत शुकशुकाट होता.
गावनिहाय 24 मे 2020 पर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या
तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या - 25
अलबादॆवी १
गवसॆ  ३
सोनारवाडी १
चिंचणॆ 3
नागणवाडी - 1
इब्राहिमपूर - 2 
तेउरवाडी - 2
बोजुर्डे - 1 
नागवे - 2
शिवनगे 1
कोवाड 1
सतेवाडी 5 
नांदुरे 2

No comments:

Post a Comment