नरेवाडी येथे सईम देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबकरणाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2020

नरेवाडी येथे सईम देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबकरणाचा शुभारंभ

नरेवाडी (ता. चंदगड) येथे सईम देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबकरणाचा शुभारंभ करण्यात आला. 
चंदगड / प्रतिनिधी
नरेवाडी (ता. चंदगड) येथील पंचक्रशीचे ग्रामदैवत असलेल्या सईम देवालयाकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक परेश पाटील यांनी करून अनेक वर्षे प्रलंबित असलेला रस्ता डांबरीकरण झाल्याने सईम देवालयाकडे जाणाऱ्या भाविकांबरोबरच या भागात शेती असलेल्या शेतकऱ्यांचीही सोय झाला आहे.  या रस्त्यासाठी २५/१५ योजनेतून पाच लाखाचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर करण्याकामी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, किणेचे माजी सरपंच जयवंत सुतार यांचे सहकार्य लाभले. रस्त्या कामाचा शुभारंभ पी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गजानन पाटील, विनायक पाटील, दयानंद पाटील, बाळू पाटील, बाबूराव पाटील, रमेश भाबंर,जानबा पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. सईम देवालयाजवळ बहूउद्देशिय हाॅल बांधण्यचा ग्रामस्थांचा मानस असून याकमी माजीमंत्री भरमुआण्णा पाटील व आम.राजेश पाटील यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment