चंदगड नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या आरोग्यासाठी धावले नगरसेवक हळदणकर - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2020

चंदगड नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या आरोग्यासाठी धावले नगरसेवक हळदणकर

चंदगड नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्याचे नगरसेवक आनंद हळदणकर यांच्या वतीने थर्मल स्क्रीनिंग करुन शरीराचे तापमान तपसाना डॉक्टर, शेजारी नगरसेवक हळदणकर व कर्मचारी. 
चंदगड / प्रतिनिधी
         कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस सर्वत्र वाढत आहे. अशा परिस्थितीतही स्वच्छता कर्मचारी अशी संकटकाळीही आपली मोलाची भूमिका बजावत आहेत. चंदगड नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. याची काळजी घेण्याच्या उद्देशाने चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक आनंद हळदणकर यांनी स्वखर्चाने मशीन आणून चंदगड नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करुन शरीराचे तापमान तपासले. त्या सर्वांचे तापमान व्यवस्थित असल्याचे समजले. कर्मचाऱ्याचे कार्य पाहता त्याच्याके दुर्लक्ष होवू नये. त्याच्याही आरोग्याची काळजी घ्यावी. या उद्देशाने त्यांचे थर्मल स्क्रीनिंग केल्याचे नगरसेवक हळदणकर यांनी सांगितले. 
          कोरोनाला हरविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाय मोठ्या प्रमाणात प्रशासन करत आहे. या युद्धात डॉक्टर,  नर्स,  पोलिस खाते,  महसूल विभाग याव्यतिरिक्त स्वच्छता कर्मचारी यांची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, डॉ. सौ. हासुरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली. आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर नगरसेवक यांनी यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला. गावची स्वच्छता करीत असताना संबंधित कर्मचाऱ्यांचे स्वतःचे आरोग्य व्यवस्थित असणे गरजेचे असल्याचे हळदणकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment