शेतामध्ये अशा प्रकारे खांब झुकल्याने शेतकऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे . |
मोरेवाडी (ता. चंदगड) येथील गावात व शेतामध्ये असणारे अनेक विद्युत वाहक खांब ठिकठिकाणी जमिनीच्या दिशेने खाली झुकले आहेत. या झुकलेल्या खांबाच्यामुळे ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण करणारे हे खांब तात्काळ महावितरणने बदलण्याची मागणी मोरेवाडी ग्रामस्थांनी केली आहे..
मोरेवाडीतील गावांतर्गत विद्युत वाहिनीमध्ये अशा झाडांचा फांद्या गेल्या आहेत. |
बोंजूर्डी ग्रुप ग्रामपंचायत असणाऱ्या मोरेवाडीतील मधील गल्लीमध्ये असणारे दोन खांब विद्युत वाहिन्यांच्या दबावाने झुकले आहेत. तसेच याच वाहिण्यांच्यामधून शेवग्याचे वृक्षही आहे़. या ठिकाणी लोकांचा वावर असल्याने पावसाळ्यात झाडात विद्युत प्रवाह आल्यास धोका निर्माण होऊ शकतो. याच गावच्या शेतामधून जाणाऱ्या उच्च विद्युत वाहिनीचे खांब वाकले असल्याने शेतकऱ्यांना शेतात वावर करताना धोका निर्माण होऊ शकतो. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने हे झुकलेले खांब त्वरीत पूर्ववत करावेत. विद्युत वाहिन्याना अडथळा करणारी झाडे अगर फांद्या त्वरीत तोडण्याची मागणी मोरेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment