चंदगड तालुक्यातील सातशे स्वॅबचा अहवाल प्रलंबित, सहा जणांचा डिस्चार्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे लांबणीवर - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2020

चंदगड तालुक्यातील सातशे स्वॅबचा अहवाल प्रलंबित, सहा जणांचा डिस्चार्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे लांबणीवर

 जिल्ह्यात स्वॅबची संख्या वाढल्याने अहवालाला विलंब
चंदगड / प्रतिनिधी
       चंदगड तालुक्यातील नागरीक विविध कामानिमित्त पुणे, मुंबई व अन्य शहरामध्ये गेले होते. कोरोनाच्या संकटामुळे यातील बरेच लोक `गड्या आपला गाव बरा म्हणत` रितसर परवानगी घेवून गावी परतले आहेत. ते शहरातून गावी परतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या स्वॅब घेवून तो तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आला आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात शहरातून आलेल्या नागरीकांच्या स्वॅबची संख्या वाढल्याने स्वॅबचे अहवाल येण्याला उशिरा होत आहे. चंदगड तालुक्यात आजअखेर ७०० अहवाल प्रलंबित असल्याची माहीती आरोग्य विभागाने सांगितले.
        शहरातून गावी आलेल्या प्रत्येक नागरीकाचा स्वॅब तपासणीला देवून त्याला त्या-त्या गावातील शाळेत व अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात सरकारने काही अटींवर नागरीकांना ऑनलाईन फॉर्म भरुन रितसर ई-पास दिल्याने अनेक लोक गावी आले आहेत. काहीचा क्वारंटाईन कालावधी संपत आला तरी अजूनही त्याचे अहवाल प्रलंबित आहेत. तालुक्यात आजअखेर 25 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर चंदगड येथील फादर ॲग्नेल इंग्लिश मेडीयम स्कूल येथील करोना केअर सेंटरवर उपचार सुरु आहेत. 
           चंदगड मध्ये आज (ता. २५) रोजी २५ कोरोना बाधीत रुग्णापैकी ६ रूग्णांना आज संध्याकाळी ६ वाजता डिस्चार्ज देण्यात येणार होता. ऐनवेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आणखीन काही दिवस रुग्णांलयात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या सर्वांना रुग्णालयात थांबावे लागणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली.


No comments:

Post a Comment