तेऊरवाडीच्या जंगलात प्रचंड प्रमाणात पिकलेली करवंदे. |
चंदगड तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. येथील डोंगररांगा मध्ये प्रचंड प्रमाणात उपलब्ध असणारी करवंदे, ज्याला डोंगरची काळी मैना असे म्हणतात ती आता डोंगरातच पिकून उलगायला सुरवात झाली आहे.
कोरोनाचा थेट परिणाम या डोंगरी रान मेव्यावर झाला आहे. येथील जंगलात करवंदे, चारे, चुरणे, भेंके, बोरे, उंबर आदि रानमेवा उपलब्ध आहे. एप्रिल, मे महिन्यात हा सर्व रानमेवा पिकतो. या रानमेव्यावर अनेक
कुंटूबे आपला उदरनिर्वाह करतात. तेऊरवाडी, हडलगे पासून ते कामेवाडीपर्यंत पसरलेल्या जंगलात अनेक ठिकामी हा रानमेवा मोठया प्रमाणात आढळतो. तसेच महिपाळगड, मोरेवाडी, विंझणे , शिरोली पासून कोकण पट्यातील हा रानमेवा जमा करून बेळगावच्या बाजारपेठेत याची विक्री करणारी अनेक कुटूंबे आहेत. सध्या करवंदे या जंगलामध्ये प्रचंड प्रमाणात पिकली आहेत. स्थानिक परिसरातील काही मुले पळसाच्या पाणांचा टोळका अगर अतीशय कौशल्यपूर्वक बनवलेली करसंबळी घेऊन सकाळच्या वेळी करवंदे आणताना दिसत आहेत. पण सध्या कोरोनाचा धुमाकुळ चालु असल्याने व बेळगाव सिमाभाग बंद असल्याने ही करवंदे तोडण्यास कोणीच आले नाही. करवंदे घ्या करवंदे अशी आरोळी आता किमान या वर्षी तरी ऐकायला मिळणार नाही. त्यातच चवीला आंबट -गोड असणारी करवंदे खायची इच्छा असुनही अनेक जन खाणे टाळत आहेत. करवंदे खाल्ली आणि खोकला लागला तर मोठी पंचाईत होईल म्हणून ती खाण्याचे अनेक जन टाळत आहेत. सध्या माञ ही डोंगरची काळी मैना डोंगरातच उलगायला सुरवात झाली आहेत.
No comments:
Post a Comment