अलबादेवी गावाने जपली माणूसकी, पुणे मुंबईसह शहरातून आलेल्या अलगीकरणातील नागरीकांची केली मदत - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2020

अलबादेवी गावाने जपली माणूसकी, पुणे मुंबईसह शहरातून आलेल्या अलगीकरणातील नागरीकांची केली मदत


चंदगड / प्रतिनिधी
        जगभरात पसरलेल्या कोरोना या  जीवघेण्या  महामारी आजारामुळे अनेक कुटूंब आपल्या जिवाच्या भीतीने आपल्या मूळगावी येत असून गावात आल्यानंतरही त्यांना अनेक आडचणीचा सामना करावा लागत आहे.त्याबरोबर काही ठिकाणी तर स्थानिक गावकरी व पुणे मुंबईकर असा विनाकारण भावनिक वाद निर्माण होत असुन भविष्यातील धोका ओळखून गावकरी व पुणे मुंबईतील मंडळी मध्ये सलोख्याचे संबंध कायमस्वरुपी रहावेत यासाठी चंदगड तालुक्यातील अलबादेवी  येथिल श्रीकांत नेवगे  यांच्या संकल्पनेतून बंडू गोळसे, परशराम चौकूळकर, धनाजी नेवगे, मारुती डांगे, यशवंत घोळसे, पांडूरंग पवार यांच्या सोबतीने पुणे मुंबईसह  परगावावरून आलेल्या मंडळींंची  शाळेत व इतर ठिकाणी अलगीकरणसाठी केले आहे. त्यांची  मायेनं विचारपूस करुन कांदेपोहे, चहा अशी व्यवस्था केली असुन सदरचा उपक्रम पुढील चारपाच दिवस चालणार आहे.
सदरील उपक्रमामुळे पुणे मुंबईसह परगावावर आलेलीली सर्व. भारावून गेली.

No comments:

Post a Comment