आमदार अनिल बेनके यांची शिनोळी चेकपोस्टला भेट, ॲम्बुलन्स सोडण्याविषयी केली चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2020

आमदार अनिल बेनके यांची शिनोळी चेकपोस्टला भेट, ॲम्बुलन्स सोडण्याविषयी केली चर्चा

शिनोळी चेक पोस्ट : आमदार अनिल बेनके  अधिकारी, कर्मचार्‍यांशी चर्चा करताना.
कागणी : प्रतिनिधी
       मुळचे माणगाव (ता. चंदगड) व सध्या बेळगाव उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदारॲड. अनिल बनके यांनी शनिवारी २३ रोजी शिनोळी चेकपोस्टला भेट दिली. 
       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन महिन्यापासून बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तुरमुरी चेकपोस्टवरून बेळगावकड़े जाणाऱ्या अम्बूंलन्सना मनाई आहे. याबाबत चंदगड लाईव्ह मधून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. यामुळे आमदार अनिल बेनके यांनी शिनोळी येथील महाराष्ट्र चेकपोस्टला भेट देऊन दोन्ही राज्यांच्या ॲम्बुलन्स ये-जा करण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी त्यांनी चंदगड तसेच बेळगाव पोलिस अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चाही केली. आमदार बेनके म्हणाले, चंदगडचे आणि बेळगावचे व्यवहार मोठे आहेत. चंदगडकराना वैद्यकीय सेवेसाठी बेळगाव शहरावर विसंबून राहावे लागते. त्यामुळे चंदगडला बेळगावची वैद्यकीय सेवा त्यांना गरजेची आहे. चंदगड तालुक्यातील तुडये, होसूर ही गावे कोल्हापूर शहरापासून १५०
किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे बेळगाव शहर हे येथील रुग्णांना जवळचे ठिकाण आहे.

No comments:

Post a Comment