आमदार राजेश पाटील यानी आजरा येथील कोविड सेंटरला भेट देवून सुचना केल्या. |
आजरा तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरला भेट देवून प्रशासकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी नागरीकांनी घाबरुन न जाता जे बांधव मुंबई, पुणे यासारख्या मोठया शहरातुन आलेले आहेत त्यांना प्रशासन व ग्रामस्तरीय दक्षता समिती यांचे माध्यमातून योग्य पध्दीतीने संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच कोवीड केअर सेंटरमध्ये असलेल्या सोयी सुविधा, खाटांची व्यवस्था याविषयी संपूर्ण आढावा घेतला. प्रशासनामार्फत उत्तम काम चालले असून त्यांचे आभार देखील मानले. यावेळी तहसिलदार विकास अहिर, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, कोविड हेल्थ अधिकारी राऊत, तालुका आरोग्य अधिकारी सोनवणे, अभय देसाई यांच्यासह वैद्यकिय उपस्थित होते.
No comments:
Post a Comment