![]() |
कोवाड गाव निर्जंतुकीकरण करताना युवक |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) या ठिकाणी कोरोणा पोजिटिव्ह रुग्ण आढळून आला. दोन दिवसा पूर्वी चिंचणे -कमलवाडी येथे सापडलेला कोरोना पेशन्ट सुद्धा भागातील आहे. यामुळे तेऊरवाडीसह कोवाड गावामध्ये सामसूम झाली. तात्काळ आज दोन्ही गावातील सर्व दुध संस्था, बँका, दूकाने बंद ठेवण्यात आल्या असून आज बाजारपेठ सहित संपूर्ण गाव ग्रामपंचायतीने दक्षता कमिटी व गावातील युवक वर्गाच्या सहकार्यातून निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे.
![]() |
सॅनिटायझर स्टँड बसविताना सरपंच अनिता भोगण,जि प सदस्य कल्लापा भोगण,ग्रामसेवक जी.एल. पाटील,प्रसन्न चौगुले वैद्यकीय अधिकारी व इतर |
मागील दोन दिवसात कर्यात भागात तेऊरवाडीमध्ये 2,कमलवाडीत 1,चिंचणे 2 बरोबर कोवाड मध्ये 1 रुग्ण सापडल्यामुळे या भागातील कोरोना बधितांची संख्या ही 6 वर गेली आहे.त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या भागातील ग्रामपंचायतींनी गावे बंद करण्यावर भर दिला आहे.दक्षता समितीच्या माध्यमातून बाहेर फिरणाऱ्या वर लगाम घातला जात आहे.आज सकाळपासून कोवाड गावातील संपूर्ण गल्ल्या ह्या बंदिस्त करून गावात प्रवेश करणारे मार्ग हे रोखून धरले आहेत.
त्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील दुर्गामाता चौक,गणपती मंदिर ,ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड या चार ठिकाणी सॅनिटायझर स्टँड बसविण्यात आले आहेत तर गावातील युवक वर्गाच्या सहकार्याने संपूर्ण गावात औषध फवारणी सुरू केली असल्याचे सरपंच अनिता भोगण यांनी सांगितले.
यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच विष्णू आडाव व सदस्यांसह शंकर पाटील, रणजित भातकांडे, रामा वांद्रे, मुकुंद व्हण्याळकर, सुनील वांद्रे वैभव हननूरकर, निखिल पाटील, शंकर गावडे बाबू बिर्जे गजानन धर्मोजी, सदानंद किणगी, दीपक मनवाडकर, वैभव वांद्रे हे युवक औषध फवारणी कामात सहकार्य करत आहेत.
No comments:
Post a Comment