चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना संरक्षक किटचे वाटप करण्यात आले. |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड शहरात खबरदारी म्हणून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेकडून शासनाच्या आदेशान्वये सद्यस्थितित कोरोंना विषाणू प्रादुर्भाव उपाय योजनांतर्गत विविध सर्वेक्षण करून माहिती जमा करण्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात आले. त्यांच्या या उत्स्फूर्त योगदानाबद्द्ल नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज अब्दुलरशिद मुल्ला यांच्या हस्ते सनकोट, टोप्या, मास्क, सॅनिटायझटर या किटचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन नगरपंचायत सफाई कामगारांना पी. पी. ई. किट साठी दिले. यावेळी नगरसेविका सौ. नेत्रदीपा प्रमोद कांबळे, सौ. संजीवनी संजय चंदगडकर, सौ. माधुरी मारुती कुंभार, नगरसेवक झाकीरहुसेन युसुफ नाईक, अभिजित शांताराम गुरबे, मेहताब आयुब नाईक, रोहित राजेंद्र वाटंगी आदीच्या सहकार्याने बचावात्मक कार्य कारणाकरिता एकूण २२ सनकोट, टोप्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment