निट्टुर मधील युवकांचा उपक्रम, आठवड्यातील एक दिवस गावासाठी - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2020

निट्टुर मधील युवकांचा उपक्रम, आठवड्यातील एक दिवस गावासाठी

निटटूर (ता. चंदगड)  येथील युवकानी गावासाठी असा बंदोबस्त ठेवला आहे.
चंदगड / प्रतिनिधी 
    निट्टूर (ता. चंदगड) येथील सर्व युवा ग्रुप, तरुण मंडळाना एकत्र करून गावावरील कोरोनाचे संकट रोखून धरण्यासाठी प्रत्येकाने आठवड्यातील एक दिवस आपल्या गावासाठी देण्याचे ठरवले आहे.
     कोरोणाचे हे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून गाव कमिटी वरची जबाबदारी आणि कामाचा ताण वाढत आहे. या कमिटी ला मदत करण्याची गरज आहे. याचसाठी हा उपक्रम राबवत असल्याचे कमिटी सदस्य श्रीधर मुर्डेकर व सुमित पाटील यांनी सांगितले. या दोघांच्या हाकेला साद देत गावातील सर्व तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला आहे. विषय गंभीर तर निट्टुर खंबीर अशा स्लोगन चा वापर करून गावात या उपक्रमाचा  प्रचार करण्यात आला.  मंडळांसाठी योग्य नियोजन करून एक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या नुसार त्या त्या गल्लीतील, मंडळातील युवा गावात खडा पहारा देणार आहेत, लोकांमध्ये जनजागृती करणे, अलागिकरण करण्यात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवणे, तसेच गावातून बाहेर जाणाऱ्या लोकांची तसेच बाहेरून गावात येणाऱ्या लोकांची नोंद ठेवली जाणार आहे. सकाळी 8 वाजल्या पासून रात्री 8 वाजेपर्यत गावातील मोक्याच्या ठिकाणी हे काम चालणार आहे. हे सर्व करत असताना ते स्वतः सोशल डीस्टंसिंगचा वापर करणार आहेत. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इतर गावातील मंडळे व युवकांनी याचे अनुकरण करून आपल्या गावातील कमिटीला मदत करण्याचे अवाहन केले जात आहे. तर अशा या उपक्रमाचे प्रत्येक गावात स्वागत करुन प्रशासनाला सहकार्य करने खूप गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment