कोवाड येथे कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2020

कोवाड येथे कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ

गावातील गल्या अशा प्रकारे अडथळा करून बंद केल्या आहेत.
कोवाड (प्रतिनिधी)
     चंदगड तालूक्याच्या पूर्व भागाची मूख्य बाजारपेठ असणाऱ्या कोवाड (ता. चंदगड) येथे कोरोणा रुग्ण सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.  येथील 26 वर्षीय महिला तिच्या 32 वर्षीय पतिसोबत इंदिरानगर भाईंदर मुंबई वरून शनिवारी 16 मे रोजी कोवाडला आली होती. सोमवार 18 मे रोजी त्यांचे चंदगड येथून स्वॅब घेऊन तपासणीला पाठविण्यात आले. तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांना सर्वोदय .इंग्लिश स्कूल मध्ये संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. गुरुवारी यातील महिलेला प्रेग्नन्सीचा त्रास सुरू झाल्यानंतर                           कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरु होते. आज शनिवारी सकाळी तिचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. त्यामुळे कोवाडसह कर्यात भाग हादरला आहे. तिच्या पतीला ताबडतोब चंदगड येथे संस्थात्मक अलगिकरन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे रीपीर्ट यायचा आहे. कोवाडला लागून असणाऱ्या तेऊरवाडी, चिंचणे -कमलवाडी येथे ५ रूग्ण या अगोदर सापडल्याने कोवाड परिसर भितीच्या छायेखाली आहे. गावातील संपूर्ण व्यवहार बंद केले असून गावामध्ये बाहेर गावच्या व्यक्तीला प्रवेश बंद केला आहे. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करुन गावच्या चारही बाजूंनी सीमा बंद केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, व्यवसाय बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा घरपोच पध्दतीने सुरळीत चालू ठेवण्याबाबत ग्रामसमितीने दक्षता घ्यायची आहे. कोरोना बाधित रुग्ण ज्या गल्ली \ मोहल्यामध्ये आढळून आला आहे. तेथील नागरीक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 
No comments:

Post a Comment