कागणी येथे सावत्र आईकडून मुलाला जाळून मारण्याचा प्रयत्न, मुलगा ६५ टक्के भाजला - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2020

कागणी येथे सावत्र आईकडून मुलाला जाळून मारण्याचा प्रयत्न, मुलगा ६५ टक्के भाजला

चंदगड / प्रतिनिधी
     सावत्र आईने मुलाच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलगा मारुती अमृत भोगण (वय-36, रा. कागणी, ता. चंदगड) हा ६५ टक्के भाजला आहे. कागणी (ता. चंदगड) येथे शुक्रवारी (ता. 22) पहाटे अडीज वाजता हि घटना घडली. या प्रकरणी संशयित सावत्र आई लक्ष्मीबाई अमृत भोगण (वय-65) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
      यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी – कागणी (ता. चंदगड) येथील शेतकरी मारुती अमृत भोगण (वय-36) हे शुक्रवारी पहाटे झोपेत असताना अडीच वाजता सावत्र आई लक्ष्मीबाई यांनी मुलगा झोपेत असल्याचे पाहून रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलगा मारुती हा ६५ टक्के भाजला आहे. मारुती हे आपल्या कुटुंबियांसह झोपले असताना सदर घटना घडली आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज हलवले. तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. सावत्र आई लक्ष्मीबाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील रॉकेलचे कॅन जप्त केले आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी चार वाजता गडहिंग्लज विभागीय पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर यांनी सदर घटनेची माहिती घेतली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून चंदगड पोलीस निरीक्षक अशोक सातपुते हे तपास करत आहेत. 


No comments:

Post a Comment