चंदगडची लालपरी निघाली थेट मध्य प्रदेशला, तेऊरवाडीतील त्या ४८ जणांना प्रशासनाने पाठवले स्वगृही - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2020

चंदगडची लालपरी निघाली थेट मध्य प्रदेशला, तेऊरवाडीतील त्या ४८ जणांना प्रशासनाने पाठवले स्वगृही

चंदगड आगाराच्या एसटीमध्ये बसून मध्यप्रदेशकडे निघालेले तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील भटके आदिवासी.
तेऊरवाडी / एस. के. पाटील
शिवाजी महाराज की जय ,महाराष्ट्राचा विजय असो असा  जयघोष करत गेल्या दिड महिण्यापासून तेऊरवाडी ता चंदगड  परिसरात अडकून पडलेल्या त्या ४८ आदिवासीना घेऊन चंदगडची लालपरी थेट मध्य प्रदेशाकडे आज दुपारी मोठ्या उत्साहात रवाना झाली . यावेळी  मायदेशी  निघालेल्या सर्वच भटक्या आदिवाशीनी चंदगड लाईव्ह न्यूज व प्रशासनाबरोबर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांचे विशेष आभार मानले.
तेऊरवाडी येथे अडकून पडलेल्या भटक्या आदिवासीना  मध्यप्रदेशला एसटी बसने पाठवताना बीडीओ आर. बी. जोशी, सभापती अॅड. अनंत कांबळे, पत्रकार नंदकुमार ढेरे, संपत पाटील.
लॉकडाऊनमुळे चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे गेल्या दिड महिण्यापासून अडकलेल्या मध्यप्रदेशातील  कटणी येथील भटक्या जमातीतील लोकांच्यासंदर्भातील, ओ भाऊ काहीतरी खायला द्या की, या मथळ्याखाली बातमी व व्हीडिओ सोमवारी चंदगड लाईव्ह न्युज ने प्रसारित केला होता. या बरोबरच या सर्वांचा चंदगड लाईव्ह न्यूजने सतत पाठपुरवा करुन बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. प्रशासनाकडून त्याची तात्काळ दखल घेत मंगळवारी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी भेट घेऊन तात्काळ  जीवणावश्यक वस्तू पुरविल्या होत्या. त्याबरोबरच याठिकाणी मेडिकल कॅम्प घेऊन  काल या सर्वांची आरोग्य तपासणी  पूर्ण केली होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे त्यांच्या गावी पाठविण्याबाबत प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार आज चंदगड एस. टी.आगाराच्या दोन गाडयामधून प्रत्येक सिटवर एक याप्रमाणे या सर्वाना गावी पाठविण्यात आले. यावेळी शासनाकडून  या सर्व प्रवाशाना प्रशासनाकडून प्रवासासाठी जेवण, नाष्टा, पाणी आदि सर्व वस्तूंचा विनामूल्य पुरवठा करण्यात आला. बसमध्ये बसल्यानंतर सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते. या सर्वानी प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर यांचे विशेष आभार मानून प्रशासनाने पुरवलेल्या सोयीबद्दल  महाराष्ट्राचा जयजयकार केला. चंदगड आगाराच्या बस मधून मध्य प्रदेशला पाठविण्यासाठी  जिल्हाधिकारी दौलत देसाई,चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, तहसीलदार विनोद रणावरे आणि नायब तहसीलदार डी एम नांगरे यांचे सहकार्य मिळाले. गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, सभापती अॅड. अनंत कांबळे, जि. प. सदस्य कल्लापा भोगण, पाणी पुरवठा अभियंता संजीव सावळगी, मंडल अधिकारी आप्पासो जिनराळे, तलाठी दिपक कांबळे, एस. टी. महामंडळाचे प्रकाश देसाई, शंकर गाडे, सरपंच सुगंधा कुंभार, ग्रामसेवि का सुनिता कुंभार, सदस्य राजेंद्र भिंगुडे, सुनिल पाटील, बजरंग पाटील चंदगड लाईव्ह न्यूजचे संपादक संपत पाटील, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, संस्थापक अध्यक्ष अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, पत्रकार एस. के. पाटील, संदिप तारीहाळकर, संतोष सुतार, चेतन शिरेगार, संजय पाटील आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment