अन....त्या भटक्या जमातीच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात ! - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2020

अन....त्या भटक्या जमातीच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात !

तेऊरवाडी : मदत प्रसंगी जयवंत पाटील (शिवनगे) व अन्य मान्यवर.
संजय पाटील / कोवाड   प्रतिनिधी
         तेऊरवाडी येथे मध्यप्रदेशातील जबलपूर कटनी येथील ४८ भटके आदिवासी बांधव गेल्या दिड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर सी एल न्युज ने "ओ भाऊ काय तरी खायला द्या की" या मथळ्याखाली बातमी व व्हीडोओ प्रसिद्ध  केला आहे. याची दखल घेत प्रशासन तसेच सामाजिक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
कोवाड येथील युवक मदत वाटप करताना
        सी एल न्यूजच्या  बातमीची प्रशासनाने दखल घेत त्यांना जीवनावश्यक वस्तूसह तातडीने आरोग्य शिबिर देखील भरवले. तसेच त्या सर्वाना गावी जाण्यासाठी बस उपलब्द करुन देण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकड़े सादर केला आहे. तयार केले आहेत. दरम्यान मंगळवारी कोवाड येथून जोतिबा भोगण, उपसरपंच विष्णू आडाव, अर्जुन वांद्रे यांनी तांदूळ, कांदे, बिस्किट वाटप केले तर भाजपचे कोवाड शहर प्रमुख सुरेश वांद्रे, लक्ष्मण मनवाडकर, उत्तम वांद्रे, विनायक वांद्रे यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली.  महापुरामध्ये सुरू झालेल्या चंदगड येथील  "प्रत्येक दिवस देशासाठी,  ग्रुपकडून धान्य आणि चप्पल वाटप केले.  शिवणगे येथील चंदगड तालूका पोल्ट्री संघटनेचे अद्यक्ष जयवंत सखोबा पाटील, गटशिक्षण विस्तार अधिकारी सुनील गोविंद पाटील (रत्नागिरी), सोनम पाटील (तांबूळवाडी) यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू, भांडी, खाऊ वाटप केले. अस्लम राजेसाहेब कडलगे यांनी मसाले पदार्थ, फळे, तांदूळ, चिरमुरे वाटप केले. आहे. चंदगड येथील उद्योजक संजय ढेरे यांनी तांदूळ दिले. अजूनही विविध ठिकाणाहुन मदतीचा ओघ सुरु असून त्यांनी याबद्दल चंदगड लाईव्ह न्युजचे आभार मानले.

No comments:

Post a Comment