लमानवाडा येथे मास्क व डेटॉल साबणाचे वाटप, वाढदिवसादिनी पत्रकार संजय पाटील यांचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2020

लमानवाडा येथे मास्क व डेटॉल साबणाचे वाटप, वाढदिवसादिनी पत्रकार संजय पाटील यांचा उपक्रम

लमानवाडयातील नागरिकांना मास्क व साबणाचे वाटप करताना पत्रकार संजय पाटील.
तेऊरवाडी (प्रतिनिधी)
        चंदगड लाईव्ह न्यूजचे कोवाड प्रतिनिधी संजय पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करता याच पैशातून लमानवाडा (ता. गडहिंग्लज) येथील वंजारा,लमाण समाजातील लोकांना मास्क व डेटॉल साबण वाटले. त्याचबरोबर या डोंगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या समस्या समजावून घेऊन भेडसावणाऱ्या प्रश्नावर त्यांच्या सोबत चर्चा केली.
        कोरोणापासून अनभिज्ञ असलेल्या व खूपच हालाकिचे जीवन जगत असलेल्या लमान वाड्यातील लोकांना मास्क व डेटॉल साबणाचे वाटप करून सॅनिटायझर कसे वापरावे, साबनाणे हात कसे धूवावेत, आरोग्याची काळजी कसी घ्यावी,  याचे सविस्तर मार्गदर्शन करण्याबरोबरच कोरोना विषयी येथील नागरिकांच्या मध्ये जनजागृती केली. पत्रकार श्री. पाटील यांनी आपल्या कृतीतून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यावेळी लमान वाड्यातील नागरिकांसह एस. के. पाटील, श्रीमती रत्नाबाई  उपस्थित होत्या.

1 comment:

Post a Comment