चंदगड कोरोनासाठी आजचा दिवस थोडा आनंद, थोड्या दुख:चा, आज १७ रुग्णांची भर, ११ रुग्णांना डिस्चार्ज, रुग्णसंख्या ४४ - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2020

चंदगड कोरोनासाठी आजचा दिवस थोडा आनंद, थोड्या दुख:चा, आज १७ रुग्णांची भर, ११ रुग्णांना डिस्चार्ज, रुग्णसंख्या ४४

चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाचे संकट राज्यासह देशात गदड होत असतानाच चंदगड तालुक्यातील लोकांच्या चिंतेत भर घालणारा आजचा दिवस ठरला. आज सकाळी दहाच्या अहवालानुसार सत्तेवाडी येथील ६ महिन्याचे बाळ कोरोना पॉझिटीव्ह आढळले तर दुपारी चारच्या दरम्यान आलेल्या रिपोर्टनुसार आणखी ६ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर सायंकाळी सहा वाजता आलेल्या अहवालानुसार आखणी ११ अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चंदगड तालुक्याची रुग्णसंख्या ४४ वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजचा दिवस चंदगडकरांसाठी थोडा आनंद, थोड्या दुख:चा ठरला.
दुपारी चारनंतर आलेल्या अहवालानुसार चंदगड तालुक्यात राजगोळी बुद्रुक, मोरेवाडी, इब्राहिमपूर, बोंजुर्डी येथे प्रत्येकी एक व कुदनूर येथे दोन असे ६ रुग्ण सापडले. यावेळी रुग्णसंख्या ३३ वर पोहोचली. हि माहीती नागरीकांना मिळते न मिळते तोवर सायंकाळी सहा वाजता आखणी ११ जणांना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चंदगडकरांना धक्काच बसला. आज सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिवसभरात एकूण बिजूर, गुडेवाडी, हिंडगाव, इब्राहिमपूर, मोरेवाडी, राजगोळी खुर्द येथे प्रत्येकी एक, बोजुर्डी व कुदनुर येथे प्रत्येकी दोन, पोरेवाडी तीन व भोगोली येथे चार असे आज दिवसभरात १७ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. चंदगड तालक्यात आठवड्याभरापूर्वी एकचा दिवशी सात रुग्ण सापडल्याने चंदगड शहरात पाच दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात आले होते. पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर काल गुरुवारी (ता. 28) चंदगड बाजारपेठ खुली झाली होती. आज तब्बल १७ रुग्ण सापडल्याने पुन्हा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

                                          आज ११ रुग्णांना डिस्चार्ज...............दिलासादायक बातमी
चंदगड मध्ये आज ११ रूग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवसांपूर्वी यातील काही रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत विचार सुरु होता. मात्र ऐनवेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आणखीन काही दिवस रुग्णालयात ठेवण्याचे आदेश दिले होते. ११ जणांचा अहवाल  निगेटिव्ह आला असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. आज या ११ जणांना घरी पाठवण्यात आल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के खोत यांनी दिली. त्यामुळे हि तालुक्यासाठी दिलासादायक बातमी आहे. 

चंदगड तालुक्यत यापूर्वी सापडलेले कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची गावनिहाय यादी - अलबादॆवी -१, गवसॆ - ३, सोनारवाडी- १, चिंचणॆ- ३, नागणवाडी - १,  इब्राहिमपूर २, तेऊरवाडी - २, बोजुर्डे - १, नागवे - २, शिवनगे -१, कोवाड - १, सतेवाडी - ६, नांदुरे – २.   

No comments:

Post a Comment