हडलगे येथील सामाजिक वनिकरण रोपवाटीका रोपविक्रीसाठी सज्ज - वनपाल मारूती डवरी - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2020

हडलगे येथील सामाजिक वनिकरण रोपवाटीका रोपविक्रीसाठी सज्ज - वनपाल मारूती डवरी

हडलगे (ता. गडहिंग्लज ) येथील सामाजिक वनिकरण विभागाची रोपवाटीका.
तेऊरवाडी ( प्रतिनिधी ) 
        पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सतत परिश्रम घेत असलेल्या हडलगे (ता. गडहिंग्लज ) येथील सामाजिक वनिकरण विभागाची रोपवाटीका रोपांच्या विक्रीसाठी सज्ज झाली आहे .जवळपास २ लाख २० हजार विविध जातीची  चांगल्या प्रतीची रोपे शासकीय  दरात विक्रीसाठी तयार असल्याची माहिती गडहिंग्लज परिक्षेत्राचे वनपाल मारूती डवरी यानी दिली.
        हडलगेपासून जवळच घटप्रभा नदि जवळ सामाजिक वनीकरण विभागाने सन २०१४- १५ साली नर्सरी तयार केली आहे. यासाठी वनविभागाने अडिज हेक्टर जमिन सामाजिक वनिकरण विभागाला हस्तांतरीत केली आहे. या सर्व क्षेत्रावर ग्रीन हाऊस बनवून चांगल्या प्रतिची रोपे बनवन्यात आली आहेत . यामध्ये आंबा , काजू , फणस, चिंच , पेरू , आवळा , बदाम . वड , पिंपळ , गुलमोहर , हिरडा , हसन , कांचन , बहावा , शिवन , रामफळ , सितारळ , चेंडू फळ आदि ८० हून अधिक जातीची रोपे तयार आहेत . ग्रीन नेट शेड , पॉली हाऊस चा वापर करून रोपांची उन्हाळ्यामध्ये सुद्धा योग्य ती काळजी घेतल्याने रोपांची वाढ चांगली झाली आहे . यासाठी गडहिंग्लज परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल हणुमंत जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मारूती डवरी आपले सामाजिक वनिकरणाचे  मजूर रामचंद्र पाळेकर, दत्ता पाटील यांच्या सहकार्याने लॉक डाऊनमध्ये ही या रोपवाटीकेची परिपूर्ण काळजी घेतली आहे . सध्या लहान पिशवितील रोप १५ रूपये व मोठ्या पिशवितील रोपे ६५ रुपये  प्रमाणे  विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन या विभागातील पर्यावरणाचा समतोल साधन्याचे आवाहन वनपाल मारुती डवरी यानी चंदगड लाईव्ह शी बोलताना केले.

No comments:

Post a Comment