कोवाडच्या कॉरंटाईन युवकांनी केले वृक्षारोपण, सर्वांनी आदर्श घेण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2020

कोवाडच्या कॉरंटाईन युवकांनी केले वृक्षारोपण, सर्वांनी आदर्श घेण्याची गरज

कॉरंटाईन केलेले कोवाड येथील चिमुकली वृक्षारोपन करताना.
तेऊरवाडी ( प्रतिनिधी )
           चंदगड लाईव्ह न्यूजने प्रसिद्ध केलेल्या रोपवाटीकेच्या बातमीने प्रेरित होत कोवाड ( ता. चंदगड ) येथील सर्वोदय इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये कॉरंटाईन केलेल्या यूवकानी वृक्षारोपन करत सर्वासमोर वेगळाच आदर्श निर्माण केला.
चंदगड तालुका पत्रकार संघाकडून वनपाल श्री डवरी याना मास्क व सॅमिटायझर देताना संजय पाटील.
     चंदगड लाईव्हने दोन दिवसा पूर्वी हडलगे येथील सामाजिक वनिकरण विभागाच्या  रोपवाटीकेची बातमी व व्हीडिओ प्रसिद्ध केले होते . या बातम्या सर्वोदय इंग्लिश मेडिअम  स्कूलमध्ये कॉरंटाईन असणाऱ्या कोवाडच्या युवक -युवती व ग्रामस्थांनी पाहिल्या . लगेच आम्हालाही या शालेय परिसरात वृक्षारोपन करून व त्या वृक्षांचे संगोपन करून कोरोनाची आठवण  ठेवण्याचा मनोदय सी . एल . न्यूजचे प्रतिनिधी संजय पाटील व एस .के. पाटील यांच्यासमोर व्यक्त केला .लगेच श्री पाटील यानी वनक्षेत्रपाल मारूती डवरी यांच्याशी संपर्क साधला .वड , रक्त चंदन , सिल्वर ओक , बदाम , गुलमोहर अशा वेगवेगळ्या चांगल्या प्रतिंच्या झाडांची वनपाल श्री डवरी यानी विनामुल्य उपलब्धता करून दिली.

आज सकाळी शाळेच्या आवारात वनक्षेत्रपाल मारूती डवरी , केंद्र प्रमूख श्री निट्टूरकर , रणजित भातकांडे , रामा वांद्रे , विनायक पोटेकर रामा यादव ,लक्ष्मण बागीलगेकर . मयूर हजारे , श्रीकांत पाटील , एस .के. पाटील , पांडू भोगण यांच्या उपस्थितित सर्व कोरंटाईन असलेल्या युवक , युवती व ग्रामस्थानी  झाडे लावा , झाडे जगवा च्या घोषणा देत उत्साहाने वृक्षारोपन  केले . यावेळी कॉरंटाईन केलेल्या सर्वानिच रोपे उपलब्ध करून दिल्याबद्धल वनक्षेत्रपाल श्री डवरी व चंदगड लाईव्ह न्यूजचे आभार मानले . तसेच वनपाल श्री डवरी याना चंदगड तालूका पत्रकार संघाकड्रन मास्क व सॉनिरायझर  पत्रकार संजय पाटील यांच्या हस्ते देण्यात  आले . वृक्षारोपनानंतर जोरदार पावसानेही हजेरी लावल्याने  सर्वाना आनंद झाला . कॉरंटाईन काळात शाळमध्ये टाईमपास करत , मोबाईल हाताळत न बसता हातात टिकाव , फावडी घेऊन वृक्षारोपनासाठी धडपड केलेल्या या सर्वांचा समाजाने आदर्श घेण्याची गरज आहे.


फोटो -
१ )

२ ) 

No comments:

Post a Comment