तेऊरवाडीच्या एकता फाऊंन्डेशनने जपली सामाजिक बांधीलकी, गावत वाटल्या अर्सेनिक अल्बम-३० गोळ्या - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2020

तेऊरवाडीच्या एकता फाऊंन्डेशनने जपली सामाजिक बांधीलकी, गावत वाटल्या अर्सेनिक अल्बम-३० गोळ्या

तेऊरवाडी येथे एकता फौन्डेशनच्या वतीने डॉ . गुंडूराव पाटील ग्रामस्थांची थर्मल स्कॅनिंग करताना सोबत उपसरपंच सौ शालन पाटील
तेऊरवाडी ( एस .के. पाटील )
     प्रत्येक गावामध्ये मंडळ, ग्रुप, संघटना व फाऊंन्डेशनचा सुळसुळाट आहे. यापैकी काही मोजक्याच संघटना समाजकार्य करत असतात तर अनेक संघटना केवळ नावालाच  आहेत. पण या सर्वांना लाजवेल असे काम तेऊरवाडीतीत एकता फाऊंन्डेशन करत आहे. कोरोनाच्या या काळात  फाऊंन्डेशनने तब्बल २५०० जनांना अर्सेनिक अल्बम -३० च्या गोळ्या तर वाटल्याच पण याबरोबर गावातील संपूर्ण  ग्रामस्थांचे रोज वैद्यकिय तपासणी चालू केली आहे.  नेहमीच सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या एकता फौंन्डेशनच्या या कार्याची चर्चा कोवाड परिसरात आहे.
     तेऊरवाडी मध्ये मुंबईवरून १४० जण आले आहेत . यामध्येच दोन संशयीत रुग्ण सापडले होते . पण त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याना घरी सोडण्यात आले . यामूळे तेऊरवाडीमध्ये घबराट पसरली होती . या काळात येथील युवकानी कडक बंदोबस्त ठेवून मॉस्क वापरण्यासंदर्भात जनजागृती केली . कॉरंटईन लोकांना अंडी वाटप केली . तसेच त्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करून कक्षाची उभारणी केली . तसेच फौंडेशनचे सदस्य डॉ . गुंडूराव पाटील यानी संपूर्ण गावातील ग्रामस्थांना गोळ्यांचे मोफत वाटप केले . तसेच पुढील अनेक दिवस  रोज सर्वांची आरोग्य तपासणी, थर्मल  स्कॅनिंग , मोफत औषध उपचार चालू ठेवले आहेत . ग्रामिण भागात कोरोनाच्या भितीमुळे अनेक डॉक्टर गायब झाले असताना डॉ . गुंडूराव पाटील मात्र पीपई किट घालून तेऊरवाडी ग्रामस्थांची काळजी घेत आहेत . त्याना एकता फौन्डेशनचे अध्यक्ष दयानंद  मारूती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले . यावेळी उपसरपंच सौ . शालन पाटील , सदस्या संगीता पाटील , राजेंद्र भिंगुडे ,  बजरंग पाटील ,डॉं .राजेंद्र पाटील ,एकताचे कार्यकर्ते  विष्णु बुच्चे ,अभय पाटील , विजय पाटील , अनिल हेंडोळे , जयसिंग पाटील , संदेश गडकरी , दिपक पाटील , अजय पाटील , रामू पाटील , अल्वीन मंतेरो  , दत्तात्रय पाटील आदि कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत . तेऊरवाडीतील प्रत्येक नागरिक निरोगी राहण्यासाठी  सतत धडपडणाऱ्या या एकता फौन्डेशनचे  कार्य माग कौतुकास पात्र आहे . या सर्व कोरोना योध्याना चंदगड लाईव्ह न्यूजचा सलाम.

No comments:

Post a Comment