चंदगड शहरातील विद्युत खांब, तारा जोडणी सुरु - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2020

चंदगड शहरातील विद्युत खांब, तारा जोडणी सुरु

चंदगड शहरातील  विद्युत खांब बदलताना. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहरातील जुने विद्युत खांब व तारांची पुर्नजोडणी पावसाळ्यापूर्वी सुरू असल्याने नागरिकांत समाधान
व्यक्त होत आहे. चंदगड शहरात विद्युत खांब बसवणे, बदलणे, लोंबकळत असलेल्या विद्युत तारा व्यवस्थित बसवणे, अडथळा येत असलेल्या ठिकाणी तो अडथळा दुर करणे, झांडांच्या फांद्यामुळे संभाव्य अडथळा होवु नये याबाबतीत नगरपंचायतीच्या व महावितरणच्या सहकार्याने पावसळ्यापुर्वी ही सर्व कामे करवून घेण्यासाठी काही दिवसापासून सूरवात झाली आहे. शहरातील नवीन वसाहत मधील महसुल भवन पासुन आंबेडकर नगरला जोडणा-या रस्त्याजवळ एक विद्युत खांब बसवण्यात आला. त्याचबरोबर काही ठिकाणी लोबंकळत असलेल्या विद्युत तारांची व्यवस्थित जोडणी करण्यात आली. याबाबत नगरसेवक आनंद हळदणकर यांनी आवाज उठवला होता. पावसाळ्या पूर्वी या कामाची दखल घेतली जात असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. महावितरणचे उपअभियंता श्री. लोधी व त्यांचे कर्मचारी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य लाभत आहे. 


No comments:

Post a Comment