कोवाड येथे भात पेरणीसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2020

कोवाड येथे भात पेरणीसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

सुगंधा शिवाजी जाधव
कोवाड / प्रातिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथे भात पेरणीसाठी शिवारात गेलेल्या महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 11.00 वाजता घडली. कोवाड येथील शेतकरी महिला सुगंधा शिवाजी जाधव (वय 45) या कोवाड-नेसरी मार्गावरील कला महाविद्यालयासमोरील मुसळे वाडी नावाच्या शेतात भात पेरणी साठी गेल्या होत्या. पेरणीचे  काम सुरु असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तातडीने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. बेळगाव येथील लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अकाउंटंट असिस्टंट प्रभाकर जाधव यांच्या त्या मातोश्री होत्या.

No comments:

Post a Comment