आज झालेल्या पावसामुळे तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील शेतवडीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. |
आज सकाळपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर उष्म्यामध्ये वाढ झाली. त्यामुळे पाऊस येणार हे संकेत मिळत होते. दुपारनंतर मात्र विजांच्या कडगडाटासह सुमारे वीस मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. चंदगड शहरासह काजिर्णे, नांदवडे, नागनवाडी, कोनेवाडी, सुळये, हिंडगाव, शिरगाव, शेवाळे यासह कोवाड परिसरातील कोवाडसह तेऊरवाडी, कागणी, होसुर, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कार्वे, सुंडी, करेकुंडी, महिपाळगड, शिनोळी, निट्टूर, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, शिवणगे, मलतवाडी, लकीकट्टे, माणगाव, तांबुळवाडी, डुक्करवाडी, हलकर्णी, दुडगे, चिंचणे, कामेवाडीसह अन्य परिसरात हा पाऊस झाला. पाऊस पडून गेल्यानंतर सर्वत्र वातावरणात गारवा जाणवत होता.
मे महिन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. कर्यात भागात तर गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे धुळवाफ पेरणीची धांदल यापूर्वीच सुरु झाली आहे. आज झालेल्या पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातही शेतीकामांना वेग येणार आहे. हा पाऊस ऊसासाठी उपयुक्त ठरला आहे. आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरीक हैराण झाले होते. आज दुपारी झालेल्या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला.
No comments:
Post a Comment