आमदार पाटील यांच्याकडून फाटकवाडी प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकामाची पाहणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2020

आमदार पाटील यांच्याकडून फाटकवाडी प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकामाची पाहणी

फाटकवाडी प्रकल्पाची संरक्षक भितींची पाहणी करताना आमदार राजेश पाटील व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
मागील वर्षी फाटकवाडी धरणाची रिटेनिंग वॉल ( संरक्षक भिंत) कोसळली होती. त्यामुळे ऐन महापुरात चंदगडसह गडहिंंग्लजची सर्व जनता भीतीच्या छायेखाली होती. यामुळे त्या भिंतीचे काम लवकर व्हावे यासाठी  आमदार राजेश पाटील यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ,  जलसंपदा सचिव राजेंद्र पवार व सर्व पाटबंधारे विभागाचे अधिकारी  यांच्या समवेत मुंबई येथे बैठक घेतली झाली होती. बैठकीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी ती संरक्षक भिंत बांधून पूर्ण करावी अशी विनंती केली होती. त्यामुळे या कामी त्वरित कार्यवाही होवून कामाची सुरुवात झाली आहे.
 काही प्रशाकीय अडचणी दूर करून त्याचे बांधकाम आता युद्ध पातळीवर चालू आहे. चालू असलेल्या कामाची दर्जा तसेच काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमदार राजेश पाटील यांनी फाटकवाडी धरणावर चालू असलेल्या बांधकामाला भेट दिली. यावेळी काम चांगल्या पद्धतीने व्हावे, तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे अशी सूचना त्यांनी केली. यावेळी तानाजी गडकरी, पुंडलिक पाटील, गोविंद अमृतस्कर, विष्णू पाटील, अनिल पाटील व संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment