कर्यात भागात वळवाने सोडपल्याने शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. |
मान्सूनपूर्व वळीव पावसाने चंदगड तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशीही झोडपून काढले. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे काही काळ नागरीकांची तारांबळ उडाली. कोवाड परिसराला सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढले. धूळवाफ पेरणीपूर्वीच पाऊस चालू झाल्याने परिसरातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
मान्सूनचे १ जून पहाटे केरळमध्ये आगमन झाले. पण चंदगड तालुक्यात ३१ मे लाच मान्सूनपूर्व वळीव पावसाने जोरदार झोडपून काढले. तेऊरवाडी, कोवाड, कालकुंद्री, राजगोळी, दिंडलकोप, मलतवाडी आदि कर्यात भागाला मान्सून पूर्व पावसाने सलग दुसऱ्या दिवशी सक्षरशः थैमान घातले . यामूळे आलेल्या पाण्यामूळे उतारावर असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . शेतकरऱ्यानी उन्हाळ्यात जमिनिची मशागत करून बांद बंदिस्थी केली होती . गतवर्षी संपूर्ण शेती वाहून गेली होती .पून्हा तसाच प्रकार घडल्याने पेरणीच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांवर आभाळ् कोसळले आहे . शेतीचे बांध फूटन प्रचंड नुकसान झाल्याने पेरण्या कशा करायच्या हा प्रश्न शेतकऱ्याना पडला आहे . तेऊरवाडीच्या उतारावरील रस्त्यावर पाण्याच्या जोरदार प्रवाहाने प्रचंड प्रमाणात रस्त्यावर दगडे येऊन पडली आहेत. तर रस्त्याच्या साईडपट्या वाहून गेल्या. धूळवाफ पेरणीसाठी तयार असणाऱ्या शेतीमध्येच आत पाणी साठल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment