तेऊरवाडी ( प्रतिनिधी )
ज्ञान , सेवा , त्याग युवक मंडळ किटवाड ( ता. चंदगड ) यांच्या वतीने सोमवार दि ८ जून रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
कोरोना सारख्या महाभयानक रोगाच्या संसर्गाशी धाडशी प्रवृत्तीच्या बळावर अविरत कर्तव्यनिष्ठ सेवा प्रामाणिकपणे आरोग्य विभाग तर बजावतच आहे पण या पलीकडे जाऊन आरोग्य विभागाला अपघात, वयस्कर लोकांच्या रोजच्या आजारांच्या चिकित्सा, इतर जन सामान्यांचे आजारपण, ऑपरेशन्स तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे प्रसूतीच्या महिलांचे प्रश्न ही गंभीर आहेतच.
त्यामुळे यापुढील येणाऱ्या काळात कोरोनाच्या संसर्गाचा फोपावणारा प्रसार गंभीर स्वरूपाचा झालाच तर एखादी व्यक्ती स्वतःहून रक्त पेढीकडे रक्तदान करण्याच्या विचाराने मदतीसाठी धाव घेईल याबाबत शंका निर्माण होते.यासाठी आरोग्य विभागाच्या मुख्य अंग म्हणून कार्यरत असणाऱ्या रक्तपेढी संचय या विभागाचा विचार विशेष महत्वाचा आहे.ज्या आरोग्य विभागाच्या सेवेमूळे आजारपणा नंतरही माणूस जगण्यासाठीचा स्वच्छंदी श्वास घेत आहे त्या आरोग्य विभागाला भविष्यात रक्त पुरवठयाची कमतरता भासून सेवाकार्य करण्याच्या दृष्टीने गुडघे टेकण्याची वेळ येऊ नये यासाठी रक्तदान हा विचार विशेष महत्वाचा आहे याच सामाजिक विचारांचा ध्यास घेऊन येथील ज्ञान, सेवा, त्याग युवक मंडळ मार्फत किटवाड गावामधील मराठी विद्यामंदिरमध्ये महारक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे . तरी गावातील रक्तदानासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी, तरुणांनी या दोन दिवसात संपर्क करावा आणि आपली नाव नोंदणी करावी अशी विनंती मंडळाकडून करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment