वेणुगोपाल पतसंस्था व इंण्डेनकडून करोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख २१ हजारांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2020

वेणुगोपाल पतसंस्था व इंण्डेनकडून करोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख २१ हजारांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाचा धनादेश तहसिलदार यांना देताना वेणुगोपाल पतसंस्था चंदगडचे संस्थापक मल्लिकार्जुन वाटंगी, नौशाद मुल्ला व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
देशासह राज्यात करोनाच्या फैलाव वाढत आहे. सरकार या विषाणुशी लढत आहे. अशा परिस्थितीत वेणुगोपाल ग्रुपने संकटकाळी मदत करण्याच्या हेतुने सामाजिक बांधिलकी जपत वेणुगोपाल ग्रामीण बिगर शेती पतसंस्था  चंदगड यांच्याकडून एक लाख रुपयांचा निधी संस्थापक मल्लिकार्जुन वाटंगी यांनी 
कोविड-19 यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ हजार १११ रुपयांचा धनादेश देताना वेणुगोपाल इंण्डेनचे चेअरमन प्रविण वाटंगी.
तर इंडियन ऑइल कार्पोरेशन एल. पी. जी. चे वितरक मे. वेणुगोपाल इंण्डेन यांच्याकडून चेअरमन प्रविण वाटंगी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड १९) ला २१ हजार १११ रुपयांचा धनादेश तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रसंगी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपिक के आर कोळी, नजीर आगा,  नौशाद मुल्ला, कृष्णा पाटील,  मॅनेजर विनायक दड्डीकर, विनायक गावडे व उमेश तेली उपस्थित होते.

No comments:

Post a Comment