आमरोळी येथे ग्रामस्थाना गॅस्ट्रोची लागण ,300 रूग्णावर उपचार , वैद्यकीय पथक दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2020

आमरोळी येथे ग्रामस्थाना गॅस्ट्रोची लागण ,300 रूग्णावर उपचार , वैद्यकीय पथक दाखल

आमरोळी (ता. चंदगड) येथे दुषित पाण्यामुळे नागरीकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने तपासणी करताना वैद्यकीय पथक.
 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
      आमरोळी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पूरवठा झाल्याने गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावातील 300 रुग्णावर अडकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ बी.डी सोमजाळ यांच्या पथकाद्वारे उपचार सुरू आहेत .घटप्रभा नदीवर  गावाला पाणी पूरवठा करणारी ५५लाखांची जलस्वराज योजना कार्यान्वित आहे .१जून पासून पडत असलेल्या पावसामुळे घटप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात आलेले गढूळ पाणी आमरोळी गावाला पूरवठा करणार्या विहीरीत घुसले,हे गढूळ पाणीच ग्रामपंचायतीच्या कृपेने गावाला पाजवण्यात आले. गेले बरेच दिवस पाणी निर्जंतूकरण करण्यासाठी पाण्यात टिसीएल पावडर किंवा अन्य औषधाचा वापर ग्रामपंचायतीने केला नाही.त्यातच  नदीवरील विहिरीतुन गढूळ पाण्याचा वापर केल्याने नागरिकाना संडास, जुलाबाची त्रास मोठ्या प्रमाणात सूरू आहे. या साथीकडे पहिल्यांदा आरोग्य विभागाने दूर्लक्ष केले,मात्र गॅस्ट्रोची तीव्रता वाढल्याने काल दि 2जून पासून अडकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ बी डी सोमजाळ  हे वैद्यकीय पथकासह आमरोळीत ठाण मांडून रूग्णावर उपचार करत आहेत. तीन दिवसात जवळपास 300 रूग्णावर उपचार करून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.दरम्यान काल सभापती अँड अनंत कांबळे,गटविकास अधिकारी आर बी जोशी,तालूका वैद्यकीय अधिकारी डाॅ.आर के खोत यानी आमरोळी येथे भेट देऊन परिस्थितीतीचा पहाणी केली.   
     सद्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने नागरिकातून भितीचे वातावरण पसरले आहे. दवाखान्यात आजारी माणसे गेली तर त्यांना जवळून तपासणी केली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी माणूस भितीने हादरून जात असतानाच आमरोळी येथे या संडासच्या  साथीने गावातील जनता हैराणझालीआहे. 
 आमरोळी येथे ५५ लाखाची जल स्वराज्य योजना राबवली आहे. तरीही आमरोळी ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी मिळत नाही. निवडणूकीच्या काळात दिलेली स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य,आदी सह अनेक आश्वासने का पाळली जात नाहीत ,असा सवालही - - - ?नागरिकांतून विचारला जात आहे. 

गावाला पूरवण्यात येणार्या नळपाणी योजनेतून दूषित पाणी गावाला पूरवण्यात आले.हे दूषित पाणी पिल्यानेच नागरिकाना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. जवळपास 300 रूग्ण तपासून उपचार केले आहेत, सध्या साथ आटोक्यात आली असून वैद्यकीय पथक आमरोळीत ठाण आहे.  डाॅ बी डी सोमजाळ, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र,अडकूर 

 गावाला दूषित पाण्याचा पूरवठा झाल्याने गॅस्ट्रोची लागण झाली आहे,हे खरे आहे.कर्मचार्याच्या दूर्लक्षामूळे पाण्यात टी सी एल टाकाण्याचे राहून गेले.पण आता पाणी तपासणी साठी नमुने घेतले आहेत.पाणी निर्जतूकीकरण करूनच गावाला पूरवण्यात येत आहे. वैद्यकीय पथकामूळे गावातील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आली असल्याचे सरपंच सौ. सुवर्णा मंडलिक-पाटील यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment