चंदगडला खरीप हंगामात होणार १४ हजार हेक्टर वर पेरणी,बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांची लगबग - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2020

चंदगडला खरीप हंगामात होणार १४ हजार हेक्टर वर पेरणी,बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांची लगबग

बैलांच्या साह्याने शेतीची पेरणीपूर्व कुळवणी करताना शेतकरी.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा  (नंदकुमार ढेरे)
           चंदगड तालूक्यात खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असून पेरणी साठी शेतीकामाला वेग आला आहे.  मोसमी पावसाला सुरवात होत असल्याने चंदगड तालूक्याच्या किणी-कर्यात या  भागात धूळवाफ पेरणीपूर्व कामाला वेग आला आहे . त्याबरोबरच खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे .या खरीप हंगामात चंदगड तालुक्यात १४४७१हजार हेक्टरवर होणार भाताची पेरणी तर नाचणी- ५७०१ ,भुईमूग- ३५७०, सोयाबीन- ४० बटाटा/ रताळी-२२०० हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे,  ऊसाची-११०११  हेक्टर क्षेत्रावर लागण झाली आहे. 
        या हंगामात पेरणी वर कोरोनाचे सावट असले तरी शेतकर्याना खते,बियाणे यांचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी कृषी विभाग कार्यरत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी दिली
       चंदगडच्या पूर्वं भागात रोपेऐवजी धूळवाफ पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते . या अगोदर परिसरात वळवी पाऊस पडल्याने शेतीमशागत काम करणे सोपे झाले आहे . त्यामूळे कोवाड ,तेऊरवाडी, कुदनूर,दुंडगे , किणी , निट्टूर , मलतवाडी , म्हाळेवाडी आदि परिसरात धूळवाफ पेरणी केली जाते . शेतकरी वर्ग सकाळीच शेतामध्ये दाखल होत आहेत .कोरोणामुळे गावापेक्षा शेतच बरे असे म्हणून शेतीकामातच ते व्यस्त आहेत . नांगरणे , कुळवणे , फळे लावून शेत सपाटीकरण करणे , शेतातील काश्या ,दगड व कचरा वेचणे , बांद बंदिस्ती करणे आदि कामे वेगात चालू आहेत . बैलजोडया कमी झाल्याने बरेच शेतकरी ट्रॅक्टर, पावर ट्रेलर यांचा उपयोग करत आहेत . तर शेतामध्ये गतवर्षाच्या पुराने प्रचंड नुकसान झालेले शेतकरी जेसीबी मशिनचा आधार घेत आहेत .बैलांच्या औताचे दिवस भाडे १२०० रुपये झाले आहे तर ट्रॅक्टर भाडे ताशी ६०० रुपये इतके आहे . कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची खूप अडचण झाली आहे . याबरोबरच पारंपारिक बियाणापेक्षा आधुनिक बियाणांचा वापर करण्यावर शेतकरऱ्यांनी भर दिला आहे.तर एन.पी.१२५,अमोघ, ओमसाई,  शुभांगी, अमन,मीनाक्षी, अभिरूची,लक्ष्मी, इंद्रायणी, रत्नागिरी २४,आर-१, थोरली कर्जत, ही बियाणे खरेदी करतांना शेतकरी दिसत आहे .मका आफ्रिकन टाॅल,सफल,तर भुईमूग महाबीजचे टीएजी२४,फुले प्रगती,व सोयाबीनची धनश्री,कृषीधन या बीयानाना शेतकर्याकडून मागणी आहे,चंदगड तालुक्यात खासगी कृषी सेवा केंद्र  व चंदगड तालूक्यात चंदगड तालूका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांसाठी खाते व बियाणे उपलब्ध करून दिले आहे.

No comments:

Post a Comment