पत्रकार अनिल केसरकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2020

पत्रकार अनिल केसरकर यांचे निधन

अनिल दत्तात्रय केसरकर
चंदगड / सीएल वृत्तसेवा
देवरवाडी ( ता. चंदगड) येथील रहिवासी, प्रसिद्ध कवी, पत्रकार, शिक्षक, अनिल दत्तात्रय केसरकर (वय-५४) यांचे मंगळवार दि. २ रोजी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने  निधन झाले. केसरकर यांनी प्राथमिक मराठी शाळेत माडवळे, कोकरे, नागनवाडी, कोलिक आदी ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. केसरकर यांची एक विज्ञानप्रेमी, रोखठोक भूमिका मांडणारे व्यक्तिमत्व अशी ओळख होती. त्यांचे वैज्ञानिक लेख,कथा आदी साहीत्य प्रकाााशित झाले आहे.  शैक्षणिक विज्ञानप्रदर्शनात तालुकास्तरावर सलग १५वर्षे प्रथम क्रमांक मिळवण्याचा विक्रम केसरकर यांनी केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गूरूवार दि.४रोजी सकाळी आहे.
No comments:

Post a Comment