मजरे कार्वे येथे ग्रामपंचायतीमार्फत मास्क व सँनिटायझरचे वाटप करताना अंगणवाडी सेविका व इतर. |
कोरोना विषाणूचा फैलाव चंदगड तालुक्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मजरे कार्वे या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गावात संपूर्ण चंदगड तालुक्याचा संपर्क होत असतो. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव गावात होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मास्क व सँनिटायझर चे वाटप करण्यात आले.
गावातील प्रत्येक नागरिकाला एक मास्क व प्रत्येक घरात अर्धा लिटर सँनिटायझर चे वाटप करण्यात आले. वाढत्या कोरोनाच्या महामारी पासून बचाव करण्यासाठी या मास्क व सँनिटायझर ची खरी गरज आता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या सूचनांचे पालन करून मास्क व सँनिटायझर चा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी मास्क घातल्या शिवाय जाऊ नये असे आवाहन सरपंच शिवाजी तुपारे यांनी यावेळी केले.
यावेळी २५०० मास्क व ५५0 सँनिटायझरच्या बॉटलचे वाटप गावात करण्यात आले. यावेळी उपसरपंच निवृत्ती हारकारे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बेनके, दिलीप परीट, स्मिता बेनके बेबीताई बोकडे, प्रियांका हारकारे, अंजली सुतार, ग्रामसेवक शिवाजी दुंडगेकर, अंगणवाडी सेविका रेखा पाटील, दीपा बोकडे व आशा स्वयंसेविका पूजा बिरजे उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment