तुडयेच्या कोरोना रूग्णासह ९ जणावर चंदगडला उपचार - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2020

तुडयेच्या कोरोना रूग्णासह ९ जणावर चंदगडला उपचार

तुडये :  संचारबंदी असल्याने गावात सर्वत्र सामसूम आहे.
कागणी : सीएल वृत्तसेवा
         तुडये (ता. चंदगड) येथे मुंबईहून परतलेल्या एका सात वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याने तुडयेकरानीही धास्ती घेतली आहे. कोरोना रुग्णा सह एकूण 9 संशयित रूग्णावर चंदगड येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवार दि. 1 रोजी कोरोना रुग्णाला शासकीय रुग्णवाहिकेतून तर अन्य संशयिताना शासकीय बसने चंदगडला  उपचारासाठी हलवण्यात आले.
        दरम्यान तुडये येथे सरपंच व ग्रामदक्षता कमिटीचे अध्यक्ष शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक संचारबंदीचे पालन सुरु आहे. चंदगड पोलिस गस्ती पथक प्रमुख जमीर मकानदार या परिसरावर लक्ष ठेवून आहेत. गावातील दूध संकलन केंद्र, मेडिकल व दवाखाने वगळता अन्य सर्व पतसंस्था, सोसायट्या, बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत.
        उपसरपंच मधुकर पाटील, ग्रामसेवक जनार्दन पांडे, पोलीस पाटील जयवंत पाटील, कोतवाल, परशराम दळवी, संजय कोलकार, हणमंत कोलकार परिश्रम घेत आहेत. तुडये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. नायकवडी यांचे पथक कार्यरत असून सध्या गावातील शाळेमध्ये मुंबईतून आलेले दहा जण अलगिकरण कक्षात दाखल असून कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 8 जणावर चंदगड येथे उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment