चंदगड तालुक्यात १ जूनला दिवसभरात दहा जण पॉझिटीव्ह, तालुक्याची रुग्णसंख्या ६३ - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2020

चंदगड तालुक्यात १ जूनला दिवसभरात दहा जण पॉझिटीव्ह, तालुक्याची रुग्णसंख्या ६३

चंदगड / प्रतिनिधी
          देशासह राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असतानाच चंदगड तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. १) दिवसभरात एकही रुग्ण नसताना रात्री मात्र एकदच बोजुर्डी एक, जंगमहट्टी दोन, राजगोळी तीन, नांदवडे येथील चार असे काल रात्री उशिरा चंदगड तालुक्यात १० जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. एकदम दहाजण सापडल्याने अनेक गावात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. 
     सद्यस्थितीला मे महिना संपून जून महिन्याला सुरवात झाली आहे. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस संपूर्ण पावसाळ्याची चाहूल लागली आहे. पावसाळ्यात ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे समजते. सोमवारी दिवसभरात बाधित झालेल्या रुग्णांच्यापैकी नांदवडे चार व जंगमहट्टी दोन येथील सहा जणांचा स्वॅब २९ मे २०२० रोजी घेण्यात आला होता. बोजुर्डी एक व राजगोळी येथील तीन असे चार जणांना स्वॅब ३० मे २०२० रोजी घेण्यात आला होता. या सर्व दहा जणांचा अहवाल १ जून २०२० रोजी रात्री उशिरा साडेअकरा वाजता पॉझिटीव्ह आला. तीन महिला व सात पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. सर्वात कमी वयाची २३ वर्षाची महिला असून ५४ वर्षाचा पुरुष आहे. एकाच दिवशी दहा रुग्ण सापडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. या दहा जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संस्थात्मक अलगीकरणात असताना पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने ही संख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी इतरांपासून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment