![]() |
पार्ले (ता. चंदगड) येथे विजेच्या धक्याने मृत पावलेली म्हैस. |
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
पार्ले ता.चंदगड येथील उबंळ नावाच्या शेतात वीज वितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तुटलेल्या वाहिनींचा स्पर्श होऊन मनोहर मारुती गावडे या शेतकर्याच्या दोन म्हैशीचा जागीच मृत्यू झाला.त्यामुळे या शेतकर्याचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.वादळामुळे विद्युत खांबावरील वाहिन्या तुटून पडल्या होत्या. उबंळ नावाच्या शेताकडे मनोहर गावडे हे म्हैशीचा चारावयला घेऊन जात असताना या वाहिनीना म्हैशीचा स्पर्श झाला,व म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी भेट देऊन पशूवैद्यकिय अधिकारी डाॅ एस एम कोळी, वीज वितरण चे अभियंता श्री प्रा,पोलिस पाटील एस बी फोंडे,माजी तंटामूक्त अध्यक्ष सुधाकर पाटील, लक्ष्मण गावडे,माजी सरपंच शामराव गावडे यानी पंचनामा केला,बाजारभाव प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
No comments:
Post a Comment