महागांव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलीटेक्निकची इमारत. |
महागांव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलीटेक्निकला देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च असे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन (एन.बी.ए.) कडून सर्वोच्च मानांकन मिळाले. या पाँलिटेक्निक मधील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आणि कॉम्प्यूटर, इजिंनिरिंग विभागातील अभ्यासक्रमांसाठी सन 2023 पर्यत म्हणजेच एकूण तीन वर्षांसाठी एन. बी. ए. मानांकन प्राप्त झालेल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली.
एन. बी. ए. ही तंत्र शिक्षण संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून १९८९ मध्ये वॉशिंग्टन अकॉर्डनुसार झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रमाणित करारांची सदस्य आहे. म्हणून हे मानांकन मिळालेल्या संस्थेतील विद्यार्थी हे देशातील मानांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या तोडीचे संबोधले जातात. या मानांकनामुळे संस्थेच्या अभ्यासक्रमांना एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याने महाविद्यालयास शासनाकडून विविध प्रकारचा निधी मिळण्यास मदत होते.
मानांकन मिळविण्याकरिता या पाँलिटेक्निकने प्रमाणित पद्धतीचे सर्व कागदपत्रे सादर केले त्यातील प्राथमिक निकषांवर संस्थेची गुणवत्ता सिद्ध झाल्यावर एन.बी.ए. कडून एकूण चार तज्ज्ञांच्या समितीने संस्थेस दिनांक 3 ते 5 जानेवारी 2020 दरम्यान भेट देऊन सादर केलेल्या माहितीची शहानिशा व वस्तुस्थिती पाहून आपला अहवाल एन.बी.ए.कडे पाठविला. समितीने या संस्थेच्या विविध निकषांवर आधारित नेमून दिलेल्या ९ टप्प्यात मूल्यमापन करून तपासणी केली असता मुख्यत्वे संस्थेची शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रमाचा दर्जा व त्याची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, शैक्षणिक व पायाभूत सुविधा, कॅम्पस प्लेसमेंट,भारतीय उद्योग मंडळ व आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद संयुक्त विद्यमाने उद्योजकता करीता सिल्व्हर किंग,अटल इनोव्हेशन मिशन निती आयोग नवी दिल्ली कडून ग्रामीण भागात नाविण्यपुर्ण उद्योजकता वाढीसाठी केद्रं म्हणून या पाँलिटेक्निकची प्रथमच निवड करण्यात आली आहे. मायक्रोसाॕफ्ट कडून कोविड -19 मध्ये आँनलाईन कार्यप्रणाली
तसेच यापूर्वी मिळालेल्या मानांकनापासून ते आत्तापर्यंत महाविद्यालयांने केलेली प्रगती,निकाल,डिजीटल ग्रंथालय,विद्यार्थी अभिप्राय याची दखल घेऊन सर्वोच्च मानाकंनास पात्र ठरवले.आता या मानांकनाचा फायदा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका प्राप्तीनंतर करिअर करताना देखील होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रामधील अग्रमानांकित काँलेजच्या यादीत अग्रभागी असलेले संत गजानन महाराज शिक्षण समूह संचलित या पॉलीटेक्निकची सुरुवात 2008 साली झाली व अल्पावधितच गुणवत्तेच्या जोरावर गरुडभरारी मारत अखेर यशाच्या शिखरावर विराजमान झाली आहे.
मानांकनाबद्दल सर्व विभाग प्रमुखांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे चेअरमन अॅड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, संस्थेचे सचिव अॅड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. सौ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सौ . सुरेखा चव्हाण यानी कौतुक केले.
" अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, परंपरा तसेच त्यांना रोजगाराभिमुख बनविणे हेच आमचे वैशिष्ट्य आणि प्रमुख उद्दिष्ट आहे.मानांकन प्राप्त झाल्यामुळे संत गजानन पाँलिटेक्निकला राज्यात तसेच देशात नावलौकिक प्राप्त झालेला आहे '' असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅड. डॉ. आण्णासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले .
या कामी समन्वयक विकास साळूंखे ,उपप्राचार्या रोहिणी पाटील ,प्रा.संतोष गुरव,प्रा. अब्दुलहमिद मुल्ला , प्रा. निलजित माळी , प्रा. विक्रम मोहिते , प्रा. मंजूनाथ पाटील , प्रा. महादेव बंदी,प्रा.कविता कुरळे , प्रा.सुरज चौगुले व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment