अतिवाड गाव ठरले कोरोना हॉटस्पॉट, दोन दिवसात 15 रुग्ण - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2020

अतिवाड गाव ठरले कोरोना हॉटस्पॉट, दोन दिवसात 15 रुग्ण

कागणी : सीएल वृत्तसेवा 
           चंदगड तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या बेळगाव तालुक्यातील अतीवाड या गावात दोन दिवसात 15 कोरोना रुग्ण सापडल्याने या गावाची बेळगाव तालुक्यासह चंदगड तालुक्यातही कोरोना हॉटस्पॉट म्हणून चर्चा सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी बेळगाव येथे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक शासनाने ही अतीवाड फाटा याठिकाणी चेकपोस्टही सुरू करण्यात आले आहे. कोरोनाबाबत मोठी खबरदारी घेण्यात येत आहे, मात्र दोन महिन्यानंतर चेकपोस्ट असणाऱ्या या गावातच कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बेळगाव तालुक्यासह चंदगड तालुक्यात कोरोना हॉटस्पॉट गाव म्हणून अतिवाड या गावांकडे पहिले जात आहे. त्यामुळे अतिवाड गावाजवळ असणाऱ्या चंदगड तालुक्यातील होसूर, कौलगे, बुक्कीहाळ बुद्रुक, बुक्कीहाळ खुर्द, किटवाड, कुदनुर या गावानी ही आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  अतिवाड़मध्ये मुंबई येथे नोकरीला असणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मुंबई येथून पंधरा दिवसापूर्वी 48 जण गावी आले होते. त्यांना गावातील शाळेमध्ये कोरंटाईन करण्यात आले होते. सदर 48 जण कोरंटाईन कालावधी संपल्यानंतर शाळे तून घरी गेले होते. या नंतर 4 दिवसांनी हा अहवाल रिपोर्ट आला आहे. यामध्ये 15 जण पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment