धनंजय जाधव |
६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हिंदूपदपादशाह झाला, रयतेला आधार असलेला राजा छत्रपती झाला. त्याच राज्याभिषेकाचा उत्सव दरवर्षी आपन मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतो. परंतु यावर्षी "कोरोना (कोव्हिड-१९)" या महामारीमुळे आपल्याला दुर्गराज रायगड वर पोहचतां येणार नाही, यामुळे आपण घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहचावे यासाठी "शिवराज्याभिषेक सजावट स्पर्धा व निबंध स्पर्धा" चे आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे विविध पैलूंचा विचार करुन, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करुन व छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केंद्रस्थानी मांडून घरोघरी शिवराज्याभिषेक साजरा करावा. यामध्ये शिवप्रतिमेचे व पुस्तकांचे पुजन करून ऐतिहासिक डेकोरेशन ( सजावट ) घरगुती साहित्याचा वापर करून एक वैचारिक संदेश समाजाला देवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वच क्षेत्रात आदर्श घेऊ शकतो अश्या सर्व विषयांवर तुम्ही निबंध लिहून देखील सहभागी होण्याचे आवाहण छावा प्रमुख धनजंय जाधव यांनी केले आहे. शिवराज्याभिषेक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क व EMAIL:-
chhawamaharashtrarajya@gmail.com,अजय(दादाराव) बोबडे - 8412841264, सोमनाथ ढोले पाटील- 9665665353 येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment