कोवाड येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला उदंड प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2020

कोवाड येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला उदंड प्रतिसाद

कोवाड : येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे , उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर तालुका प्रमुख अशोक मनवाडकर व इतर.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
          कोवाड (ता. चंदगड) येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चंदगड तालुका शिवसेना शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उदंड प्रतिसाद मिळाला. शिबीर स्थळी सकाळपासून रक्तादानासाठी युवकानी गर्दी केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. विठ्ठल रखुमाई मंदिरात शिबीर झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर उपस्थित होते. गडहिंग्लज येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेने रक्त संकलनाचे काम केले. राज्यावर कोरोनाचे संकट आल्याने आपण रक्तदानाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी पुढे आल्याचे युवकानी सांगितले. त्यामुळे कोवाड परिसरातील तेऊरवाडी, निट्रटूर, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी, दुंडगे, होसूर, किणी, नागरदळे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी येथील युवकानी दुपारपर्यंत रक्तदानासाठी शिबीराच्या ठिकाणी गर्दी केली होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० युवकानी रक्तदान केले होते. त्यामुळे ४० बॅग रक्ताचे संकलन झाले. रक्तदानासाठी आलेल्या युवकांचा संख्या विचारात घेता दिवसअखेर ते ७० बॅग रक्ताचे संकलन करण्याचे नियोजन असल्याचे मनवाडकर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकट समयी राज्यात रक्ताची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी रक्तदान शिबीर आयोजित केल्याचे सांगून देवणे यांनी रक्तदान केलेल्या युवकांचे कौतुक केले. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध पातळ्यांवर नियोजन केले आहे. नागरिकानी घाबरून न जाता. घरी सुरक्षित राहिले पाहिजे. मास्क शिवाय बाहेर पडू नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी किरण कोकितकर, दत्ता पाटील, रणजित भातकांडे, आप्पा सुरुतकर, शिवानंद आंगडी, सुधिर पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment