![]() |
चंदगड शहरामध्ये पानपट्टी दुकाने चालू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देताना असोशियशनचे पदाधिकारी. |
चंदगड शहरांमध्ये 50 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजारहून अधिक पानपट्टीची दुकाने असून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या 20 ते 25 हजार इतकी आहे. त्यामुळे गेले 70 दिवस दुकाने बंद आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने दुकाने चालू करण्यास सशर्त परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पानपट्टीची दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी. लॉकडाऊन असल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचे असोसिएशनच्या वतीने निवेदन म्हटले आहे. काही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील मुलू या गावच्या एका पानपट्टी व्यावसायिकाने आर्थिक अडचणीतून उपासमारीमुळे, निराश होऊन आत्महत्या केली. त्यामुळे या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आम्हाला पानपट्टी सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी चंदगड पानपट्टी असोसिएशन'च्या वतीने तहसिलदार विनोद रणवरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी अब्दुल मदार, नियाज मदार, उमेश गवळी, सलीम मकानदार,अमित कांबळे उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment