सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाचा चंदगड तालुक्यातही आज नव्या तीन रुग्णांची भर पडली आहे. आज दुपारी एक वाजता आलेल्या रिपोर्टनुसार नांदवडे येथील दोन तर निट्टूर येथील एक असे तीन नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या ६७ वर पोहोचली आहे.
निट्टूर येथे पहिलाच रुग्ण सापडला असला तरी नांदवडे येथील रुग्णांची संख्या सात झाली आहे. त्यातील एकजण बरा होऊन आला आहे. नांदवडे येथील ३० वर्षाच्या पुरुष व ३६ वर्षाची महिला, तसेच निट्टूर येथील ३६ वर्षाच्या महिला या सर्वांचा स्वॅब ३ जून २०२० रोजी घेण्यात आला होता. त्याचा आज लगेचच अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. एकीकडे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण वाढत असले तरी चंदगड तालुक्याच्या कोरोना केअर सेंटरमधून आतापर्यंत ३५ रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. हि समाधानाची बाब आहे.
No comments:
Post a Comment