कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांतर्गत सीमा ह्या बंद करून त्या ठिकाणी चेकपोस्ट उभे केले असून त्या त्या ठिकाणी पोलीस,शिक्षक इ.कर्मचऱ्याच्या नेमणूका करून खडा पहारा दिला जात आहे.या सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने या ठिकाणी अखेर पत्राच्या शेडची उभारणी करण्यात आली आहे .
लॉकडाऊन पासून या ठिकाणी महाराष्ट्र सीमेवर पोलीसांच्या बरोबरच शिक्षक देखील कडक पहारा देत आहेत.मात्र या गेल्या काही दिवसामध्ये वादळ वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व वळीव पावसामूळे या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.आजवर झालेल्या पावसात याठिकाणी असलेल्या झाडांचा आधार घेतच कडक बंदोबस्त ठेऊन आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे चित्र दिसत होते.इतरांची सुरक्षा करणारेच असुरक्षित असल्याची बातमी सी एल न्युज ने लावली होती.ग्रामस्थातून ही याबाबत खंत व्यक्त केली जात होती.अशा अवस्थेतही या ठिकाणचा बंदोबस्त चोख ठेवला जात होता.
अखेर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने अशा सर्व ठिकाणी शेडची उभारणी करण्याच्या सूचना करण्यात आल्यानंतर कोवाड चे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या मार्गदर्शनाने होसुर व दड्डी चेकपोस्ट वर पत्र्याच्या शेडची उभारणी करण्यात आली आहे.त्यामुळे येथील पोलीस,शिक्षक कर्मचारी तसेच ग्रामस्थातून आभार व्यक्त केले जात आहेत.
No comments:
Post a Comment