समाजमंदिराचे काम सुरु न केल्यास आंदोलनाचा खेडे ग्रामस्थांचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2020

समाजमंदिराचे काम सुरु न केल्यास आंदोलनाचा खेडे ग्रामस्थांचा इशारा

आजरा येथील गटविकास अधिकारी बी .डी. वाघ याना याना निवेदन देताना खेडे ग्रामस्थ.
आजरा -सी .एल. वृत्तसेवा
          खेडे (ता .आजरा )येथील समाज मंदिराचे काम रखडले आहे . ग्रामपंचायतीने यामध्ये तात्काळ लक्ष घालून बांधकाम लवकर सुरु करावे, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा खेडे ग्रामस्थांनी दिला  आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की, समाज मंदिरासाठी निधी मंजूर आहे मात्र ग्राम पंचायतीच्या दिरंगाई मुळे हा निधी पडून असून  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच या कामात समाजाची दिशाभूल करण्यात आली आहे. या ठिकाणी ग्रा. प. मालकीची  खुली जागा नोंद असतानाही जागा नसल्याचे भासविण्यात आले आहे .तसेच ग्रा. प. ला विकास कामात रस नसून राजकारणात रस असल्याचा आरोप केला आहे. येत्या आठवडाभरात निर्णय न झालेस सरपंच,उप सरपंच,तसेच सदस्य यांच्या दारासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति तहसीलदार विकास अहिर,स .पो .निरीक्षक बालाजी भांगे,बीडीओ,बी. डी. वाघ याना दिल्या आहेत. निवेदनावर अशोक कांबळे,सुरेश कांबळे,प्रवीण कांबळे,सूरज कांबळे,राहुल कांबळे,विकास कांबळे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment