एस. एम. देशमुख |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पत्रकार आणि आम जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख विधान परिषदेवर जाणे आवश्यक असून त्यासाठी राज्यातील पत्रकारांनी शर्थीचे प्रयत्न करावेत असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा संघांच्या पदाधिकारयांची महत्वाची ऑनलाईन बैठक आज संपन्न झाली. बैठकीत 30 जिल्हयातील प्रतिनिधी उपस्थित होते.
एस.एम.देशमुख देशमुख यांनी पत्रकार आणि सामांन्य जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.. पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असलेले एस. एम. विधान परिषदेत गेले तर राज्यातील पत्रकारांना हक्काचा आमदार तर मिळणार आहेच त्याबरोबर जनतेच्या व्यथा जाणणारा आणि त्या सोडविण्यासाठी प़ामाणिक प्रयत्न करणारा आमदार जनतेलाही लाभणार आहे.. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनी आणि जनतेनं एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी प्रयत्न करावेत, आपल्या राजकीय संबंधांचा वापर करावा असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
राज्यपालांच्या मार्फत नियुक्त करण्यात येणारया बारा सदस्यांची निवड करताना पत्रकार, साहित्यिक, कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आदि राजकारणातीत व्यक्तींचा विचार करावा अशी विनंती राज्यातील 200च्यावरती तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांनी राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.. या नावांमध्ये एस.एम.देशमुख यांचा प्राधान्याने समावेश करण्याची विनंती देखील पत्रकार संघांनी राज्यपालांकडे केली आहे.. ..एस.एम यांच्यासाठी नेत्यांच्या भेटी गाठींचे सत्र सुरू असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले..
ज्या तालुका आणि जिल्हा संघांनी अद्याप राज्यपाल आणि अन्य राजकीय नेत्यांना निवेदनं पाठविली नाहीत अशा संघांनी लगेच निवेदन पाठवावित आणि त्याच्या बातम्या आपल्या भागातील वर्तमान पत्रात तसेच सोशल मिडियात प्रसिध्द होतील असे पाहावे असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. बैठकीत एस.एम.देशमुख स्वतः उपस्थित होते.. त्यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.. आपल्या नावास राज्यभरातून मिळत असलेल्या एकमुखी पाठिंब्याबद्दल आणि राज्यभरातील पत्रकार मित्र आपल्याला विधान परिषदेत पाठविण्यासाठी करीत असलेल्या शर्थीच्या प्रयत्नाबदल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
बैठकीत परिषदेचे विश्वस्त किरण नाईक (मुंबई) अध्यक्ष गजानन नाईक (सिंधुदुर्ग) कार्याध्यक्ष शरद पाबळे (पुणे) सोशल मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे (पुणे) राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन (बीड) राज्य महिला संघटक जान्हवी पाटील (रत्नागिरी) परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे (बुलढाणा) शिवराज काटकर (सांगली) सुरेश नाईकवाडे (परभणी) योगेश कोरडे (नागपूर)यशवंत पवार (नाशिक) विभागीय सचिव मनसूरभाई (नगर), प्रकाश कांबळे (नांदेड) विशाल साळुंखे (बीड), विजय मोकल (रायगड) हरिष पाटणे जिल्हा अध्यक्ष सातारा, नंदकुमार तोष्णीवाल जिल्हा अध्यक्ष हिंगोली, माधवराव अंभोरे जिल्हा अध्यक्ष वाशिम, घोणे जिल्हा अध्यक्ष लातूर, अनिल वाघमारे परिषद कार्यकारिणी सदस्य (बीड) रोहिदास हाके (धुळे) आदि उपस्थित होते.. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत सर्व पत्रकारांनी राज्यातील पत्रकारांच्या, जनतेच्या हितासाठी एस.एम.देशमुख विधान परिषदेवर जाणे आवश्यक असल्याचे आणि त्यासाठी सर्वतोपरी प़यत्न करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
No comments:
Post a Comment