काजु महामंडळ स्थापन करून पीकाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी आमदार प्रकाश आबीटकर यांच्याकडे संघर्ष कृती समितीने निवेदन दिले. |
दौलत हलकर्णी
सध्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील काजु ऊत्पादक शेतकरी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अर्थिक अडचणीत आला आहे. या तिन्हीही तालुक्यात काजुचे उत्पादन मोठया प्रमाणात होते. काजु खरेदी कमी किंमतीमध्ये करुन काजु उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणुक होते. महाराष्ट्रच्या विधान सभेत काजु दराबाबत विषय मांडुन काजु महामंडळ स्थापन करून काजुला हमीभाव मिळवुन देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा यासाठी आम. प्रकाश आबिटकर यांना सघर्ष कृती समिती चंदगड यांच्या मार्फत निवेदण देण्यातआले.
काजु हा शेतकर्यांचा जिव्हाळयाचा विषय आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा चरीतार्थ यावरच चालतो. येत्या अधिवेशनात काजु पिका विषयी प्रश्न मांडुन शेतकऱ्याला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करू असे यावेळी आम.आबिटकर यांनी सघंर्ष कृती समितीला आश्वासण दिल्याचे अध्यक्ष गणेश फाटक यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष आनंत कांबळे ,जोतीबा गोरल ,रमेश पाटील शिवाजी पाटील उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment