कारखाना पुर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - अर्थवचे अध्यक्ष मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2020

कारखाना पुर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - अर्थवचे अध्यक्ष मानसिंग खोराटे

मानसिंग खोराटे

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
        देशावर कोरोनाचे महाभयानक संकट असताना शेतकऱ्यांना बसलेल्या आर्थिक अडचणींचा विचार करून लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उदात्त हेतू ठेवून शेतकरी वर्गाने दौलत- अर्थव प्रशासनावर विश्वास ठेवून आपला संपूर्ण ऊस पाठवला होता. अशा शेतकऱ्यांची बिले वेळेत देऊन शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे येथून पुढे जोमाने कारखाना चालवून शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे कसे जास्त पडतील याचा विचार केला जाईल असे दौलत- अर्थवचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सागितले.
          त्याचप्रमाणे कारखान्यावर तसेच आमच्या  प्रशासनावर विश्वास दाखवून तोडणी वाहतूक मंजूर व कंत्राटदार यांनी कारखान्याचे प्रतिदिनी आवश्यकतेप्रमाणे ऊस पुरवठा केला. सदर ऊस वाहतूक कंत्राटदार यांची तोडणी वाहतूक ज्या त्या वेळी देण्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यात दिला त्यामध्ये प्राधान्याने ऊस तोडणी वाहतूक यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे ऊस वाहतूकदार व तोडणी मजूर यांचा विचार करून अथर्व प्रशासनाने त्यांची सर्व वाहतूक ऊस तोडणी बिले अदा केली असून उर्वरित कमिशन डिपॉझिट संबंधित करायचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तरी संबंधित ऊस वाहतुक कत्रांटदाराने आपल्या संबंधित बँकेत संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
           कारखाण्यातील मशीनीरीची  देखभाल दुरुस्तीची कामे जलद गतीने चालू असून कारखाना वेळेत सुरू करण्याये नियोजन केले आहे. त्याप्रमाणे कारखान्याला गत हंगामात आलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करून कारखाण्यातील उपकरणाच योग्य दुरुस्ती करण्याचओ काम युध्दपातळीवर सुरू आहे. पुढील हंगामामध्ये पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचे नियोजन कारखाना प्रशासनाने केले आहे. भागातील सर्व ऊस उत्पादकांनी आपल्या संपूर्ण ऊस आपले अथर्व- दौलत साखर कारखान्यालाच पाठवावा.अद्याप काही शेतकऱ्यांनी ऊस नोंद करायचे राहिले असल्यास 30/ 6 /2020 पर्यंत कारखाना हेड ऑफिसशी संपर्क साधून करार करण्याचे आहेत. तसेच सर्व ऊस तोडणी वाहतूक कत्रांटदारांना आव्हान करण्यात येते की आपल्या वाहनाचा करार लवकरात लवकर करुण घ्यावा. कारखाण्यासा गतवर्षी जसे सहकार्य केले तसेच येथुन पुढे देखिल करावे असे आवाहन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धीरज कुमार माने यांनी केले आहे.





No comments:

Post a Comment