दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
गडहिंग्लज येथील कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयात सर्पदंशावर शेतकर्यांसाठी मोफत उपचाराची सोय केल्याची माहीती रुग्णालयाचे उपाध्याक्ष अनिरुद्ध रेडेकर यांनी दिली.
सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकरी पेरणीच्या लगबगीत आहे. अशावेळी शेतामध्ये सर्पदंशाचे प्रकार घडुन मुत्युचे प्रमाण वाढले आहे. वास्तविकता साप हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. पण पावसाचे पाणि शेतातील बिळामध्ये घुसल्याने साप बाहेर पडतात व नकळत दंश करतात. यावर त्वरीत उपचार व्हावा यासाठी कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयामध्ये डाँ बालाजी साळुंखे सर ( MD, Medicine ) यांच्या देखरेखीखाली सर्पदंशावर औषधं उपलब्ध केल्याची माहीती श्री. रेडेकर यांनी दिली.
आजरा गडहिंग्लज चंदगड भूदरगड भागातील एखाद्या शेतकर्यांच्या बाबतीत असा प्रकार घडतं कसल्यास त्यांनी त्वरीत रूग्णालयाशी संपर्क साधावा. असेही आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment