इसापूर (ता. चंदगड) येथील कु. सार्थकने केलेली मदत. |
कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासनाला समाजाच्या सर्वच स्तरातून कमी-अधिक प्रमाणात मदत होत आहे. प्रत्येक जण कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक व वस्तु स्वरुपात मदत करत असतानाच या सर्व गोष्टीतून प्रेरित होवून इसापूर (ता. चंदगड) येथील कु. सार्थक संतोष गवस या इयत्ता चौथीमध्ये मराठी विद्या मंदिर इसापूर येथे शिकणारा विद्यार्थ्यांने आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊचे जमा केलेले एक हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे,नायब तहसीलदार डी. एम. नांगरे, मुख्याधिकारी अभिजित जगताप यांच्याकडे सुपूर्द केले. समाजातून कोरोनाशी लढण्यासाठी मदत होत असतानाच या चिमुरड्यानेही आपला मदतीचा हात पुढे केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment